कोपर उड्डाण पूल श्रींच्या विसर्जनापर्यंत वाहतूकीसाठी खुला ठेवण्याची मागणी

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.१२ :- डोंबिवली  कोपर येथील वाहतूकीसाठी असलेला पूर्व पश्चिम कोपर पूला येत्या 28 तारखेपासून बंद ठेवण्यात येणार असल्याचे वृत्त प्रिसध्द होताच अनेक गणेश मंडळानी याला ठाम विरोध केला असून लवकरच श्रींचा उत्सव सुरु होत असून विसर्जनासाठी उल्हासनगर पासून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ डोंबिवलीतील मोठा गाव ठाकुर्ली येथे येत असतात. त्या मंडळांची मोठी पंचायत होणार असून किमान श्रींच्या विसर्जनापर्यत तरी कोपर पूल वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येऊ नये अशी मागणी काही गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यानी केली आहे. या संदर्भात काही कार्यकर्ते आयुक्ताची भेट घेंऊन मागणी करणार आहेत.

हेही वाचा :- पूरग्रस्तांच्या मदतीला धावले रितेश – जेनेलिया केली 25 लाखांची मदत

डोंबिवली कोपर येथील उडडान पूल येत्या 28 तारखेपासून बंद ठेवण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. यासंदर्भात रविवारी कल्याण डोंबिवली महापालिका व रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत वरील निर्णय झाला आहे. डोंबिवली परिसर, ग्रामीण भाग, उल्हासनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे विसर्जनासाठी डोंबिवलीतील खाडी पूलावर येत असतात. जर गणेश उत्सवाच्या तोंडावर पूल वाहतूकीसाठी बंद ठेवला तर मंडळाना कल्याण येथे जावे लागणार आहे व तेथे मोठी गर्दी होण्याची भिती येथील प्रिसध्द टिळकनगर सार्वजनिक गणेशेात्सव मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संदिप वैद्य यांनी व्यक्त केली. शिवाय महापालिकेचे अधिकारीही अशीच भावना व्यकत करत आहेत. म्हणून गणेश उत्सवानंतर पूल हव तर बंद ठेवावा अशी सूचना मंडळा तर्फे करण्यात आली.

तमतमाए amit shah ने loksabha में कहा – PoK के लिए जान दे देंगे

Leave a Reply

Your email address will not be published.