मुंबई प्रवेश द्वारावरील टोल वसुली बंद करण्याची मागणी…

Hits: 0

नागपूर दि.२१ :- येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे मुंबई प्रवेश द्वारावरील असलेला टोल नाक्या वरील टोल वसुली बंद करावी अशी मागणी केली. मागील तीन वर्षांपासून आ. केळकर हे मुंबई प्रवेश द्वारावरील टोल बंद करून ठाणेकरांना दिलासा द्यावा याबाबत सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. याविषयात त्यांनी तत्कालीन सा. बां. मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट ही घेतली होती. अनेकदा विधी मंडळ सभागृहात त्यांनी विषय मांडून प्रशासनाचे, सरकारचे लक्ष वेधले आहे. 

हेही वाचा :- सुधारित नागरिकत्व कायद्यावर राज ठाकरेंनी केलं भाष्य म्हणाले…

या टोल नाक्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनधारकांना दररोज प्रचंड वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागते. परिणामी प्रवाशांचा पैसा तसेच महत्वाचा वेळही वाया जातो यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण होत चालली असून केव्हा तरी या विषयात नागरिकांकडूनच स्फोटक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही व यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे आ. केळकर यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे सरकारच्या व  प्रशासनाच्या निदर्शनास आणून लवकरात लवकर एम एच ०४ व मुंबईकडे जाणाऱ्या वाहनधारकांना या टोल वसुलीपासून सूट देऊन ठाणेकरांना दिलासा द्यावा असे आ. केळकर यांनी सभागृहात सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.