बांग्लादेशच्या युवा खासदार आणि राजकीय नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली, दि.१३ – बांग्लादेशचे युवा खासदार आणि राजकीय नेत्यांच्या प्रतिनिधीमंडळाने आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात भेट घेतली. बांग्लादेशच्या राजकीय क्षेत्रातल्या पुढच्या पिढीला भेटून आनंद झाल्याचे राष्ट्रपती यावेळी म्हणाले.
हेही वाचा :- लंडन पुस्तक प्रदर्शनीत भारतीय पुस्तक दालनाचे उद्घाटन
भक्कम, समृद्ध आणि प्रगतीशील बांग्लादेश, भारताच्या मूलभूत राष्ट्रीय हिताचा आहे असे भारत मानतो. दोन्ही देशांपुढे असलेली आव्हानं समान आहेत. दोन्ही देशांमधल्या भागीदारीतून विकास कार्य पुढे नेण्यासाठी आणि समृद्धी निर्माण करण्यासाठी नवे मार्ग चोखाळण्याविषयी विचार करण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी या प्रतिनिधीमंडळाला केले.
Please follow and like us: