खोल समुद्रातील पाणबुडी बचाव प्रणाली भारतीय नौदलात समाविष्ट
नवी दिल्ली, दि.१२ – खोल समुद्रात दुर्घटनेदरम्यान पाणबुड्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणारी मदत आणि बचाव प्रणाली आज मुंबईत नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांच्या हस्ते नौदल गोदीत समाविष्ट करण्यात आली. यावेळी नौदलाचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :- डोंबिवलीतील सागाव येथील लोकवस्तीतील डंपिंग ग्राउंड हटविण्यासाठी रहिवाश्यांचे आमरण उपोषण
या प्रणालीमुळे खोल समुद्रात पाणबुडी बचाव कार्यात नौदलाची क्षमता वाढली आहे. भारतीय नौदलाच्या या नवीन क्षमतेचे संचालन आणि तैनात करण्याचे काम नौदलाच्या पाणबुडी बचाव गटाच्या चालक दलाकडून मुंबईतून केले जाईल.
Please follow and like us: