राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा- अजित पवार

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.२० :- राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.‌

हेही वाचा :- अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

पवार यांनी बुधवारी रात्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. सध्या राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून या पावसामुळे शेतकऱ्यांचे उभे पिक पाण्यात गेले असल्याचे पवार यांनी सांगितले. पवार यांनी बुधवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन याविषयी चर्चा केली होती.‌

Leave a Reply

Your email address will not be published.