फर्नीचरच्या शोरूम मध्ये घुसला भलामोठा अजगर कामगारांसह ग्राहकांची पळापळ

कल्याण दि.०९ :- कल्याण-शिळ मार्गावरील एका फर्नीचर शोरुममध्ये भलामोठा अजगर घुसल्याने कामगारांसह ग्राहकांची पळापळ काढल्याची घटना घडली. या मार्गावरील डायघर गावाच्या हद्दीत अनमोल फर्नीचर नावाचे मोठे शोरुम आहे. या शोरूममध्ये रविवारी सायंकाळच्या सुमाराला अचानक एक मोठा अजगर घुसताना एका कामगाराला दिसला. या भल्यामोठ्या अजगराला पाहून त्याने शोरूम बाहेर धूम ठोकल्याने इतरही कामगारांसह फर्निचर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी शोरूम बाहेर पळ काढला.

हेही वाचा :- जमीनवादातून डोंबिवलीत उडाला रक्तरंजित भडका २ जखमी, १२ पैकी तिघा हल्लेखोरांना अटक

त्यांनतर अनमोल फर्निचरच्या व्यवस्थापकाने पलावा सिटीत राहणाऱ्या वाॅर रेस्क्यू फाॅऊडेशनच्या सर्पमित्रांशी संपर्क करून शोरुममध्ये अजगर घुसल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र विशाल कंथारिया, महेश मोरे, रोमेश यादव, विजय राजभर यांनी घटनास्थळी येवून शोरूममधील एका लाकडाच्या मागे बसलेल्या त्या अजगराला सुरक्षित पकडून कल्याण वनविभागच्या स्वाधीन केले.

हेही वाचा :- पोलिसांच्या कबड्डी स्पर्धेत डोंबिवलीकर महिलासंघ विजयी 

दरम्यान, पकडण्यात आलेला अजगर 6 फूट लांबीची मादी असून इंडियन रॉक पायथॉन जातीचा आहे. ही अजगर मादी शारिरीक दृष्ट्या सुदृढ असल्याचा दाखला पशु वैद्यकीय अधिकारी डाॅ. सिद्धी रायबोले यांनी दिल्याने या अजगराला लवकरच निर्सगमुक्त करण्यात येणार असल्याचे कल्याणचे वनपाल अधीकारी रगडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.