कर्टन रेजर: भारत-श्रीलंका संयुक्त लष्करी सराव ‘मित्र शक्ती-6’
नवी दिल्ली, दि.२० – भारत आणि श्रीलंका लष्करांच्या दरम्यान लष्करी संबंध आणि देवाणघेवाण यांचा एक भाग म्हणून दरवर्षी मित्र शक्ती लष्करी सराव दरवर्षी घेतला जातो. 2018-19 या वर्षासाठी 26 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान श्रीलंका येथे हा संयुक्त लष्करी सराव होणार आहे. भारतीय लष्करातील बिहार रेजिमेंटची पहिली पलटण आणि श्रीलंका लष्करातील जेमुनू वॉच बटालियन यात सहभागी होणार आहेत. दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये घट्ट संबंध निर्माण व्हावे यासाठी हा अभ्यास घेण्यात येतो. संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार आंतरराष्ट्रीय घुसखोरीला आळा घालण्यासाठी तसेच दहशतवादाचा सामना करण्यासाठी डावपेचात्मक कारवाईचा यात समावेश असेल.
Please follow and like us: