Dombivali ; अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू
Hits: 0
डोंबिवली दि.०३ :- कल्याण-डोंबिवली मार्गावरील विकास नाकाजवळ आज सकाळी दहा वाजता डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा :- Kalyan ; एसटी डेपोत चोरट्यांचा सुळसुळाट
मिळालेल्या माहिती नुसार, गणेश हेंद्र्या चौधरी (३२), त्यांची पत्नी ऊर्मिला चौधरी (२५) आणि मुलगी हंशीका (४) यांच्या बरोबर डोंबिवली एमआयडीसी रोड वरून जात असतांना त्यांच्या पुढे असलेल्या वेगवान डंपरला ओवरटेक करण्याच्या नादात त्यांचे वाहन त्या डंपरच्या मागील चाकाखाली आले. त्यात तिघांचा जागीच मृतु झाला आहे तर दोन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.