सीएसपीपी आणि ईपीईचा निकाल संस्थेच्या संकेतस्थळावर 25 फेब्रुवारीला जाहीर होणार

मुंबई, दि.२३ – डिसेंबर 2018 मध्ये घेण्यात आलेल्या कंपनी सेक्रेटरीज प्रोफेशनल प्रोग्राम आणि एक्झिक्युटीव प्रोग्राम एक्झामिनेशन्स या परीक्षांचा निकाल 25 फेब्रुवारी 2019 ला अनुक्रमे सकाळी 11 आणि दुपारी 2 वाजता जाहीर होणार आहे. दि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांनी ही माहिती दिली आहे.

हेही वाचा :- द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी भारत-कॅनडा चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधीमंडळ भारत दौऱ्यावर

निकाल संस्थेच्या www.icsi.edu या संकेतस्थळावरुन जाहीर होणार आहे. उमेदवारांचे विषयानुरुप गुणही संकेतस्थळावर उपलब्ध होतील. एक्झिक्युटिव प्रोग्राम एक्झामिनेशनचे उमेदवार संकेतस्थळावरुन निकाल जाहीर झाल्यावर लगेचच ई-निकाल डाऊनलोड करुन गुणपत्रिका मिळवू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published.