लग्न झाले असतानाही तरुणीची फसवणूक करणाऱ्या तरुणावर गुन्हा – डोंबिवलीतील घटना
डोंबिवली दि.२२ – लग्न झालेले असताना एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून साखरपुडा करून घेत लग्नाची तारीख ठरवली. मात्र त्या तारखेला आजारी पडल्याचा बहाणा केला. पिडीतेला संशय आल्याने तिने शहानिशा केली असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पिडीत महिलेने मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :- डोंबिवलीतील म्हसोबा चौकाजवळ दुचास्की चे अनधिकृत पार्किंग होत असल्याने त्यामुळे अपघात होण्याची भीती
गौतम दुसाने उर्फ गौतम वडनेरे असे फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो बदलापूर येथे राहतो. पिडीत तरुणीची ओळख गौतम दुसाने उर्फ गौतम वडनेरे याच्याशी झाली होती. गौतमचे लग्न झालेले असताना त्याने ते लपवून लग्नाची मागणी घातली. जून महिन्यात पिडीत तरुणीच्या सोबत साखरपुडा उरकून घेतला. त्यानंतर लग्नाची तारीख ठरली. पिडीत तरुणीने सगळा खर्च केला होता. मात्र गौतमने आजारी पडण्याचा बहाणा करत लग्न करण्यासाठी टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्यचे लक्षात आल्या नंतर तिने या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हेही वाचा :- तपासाच्या बहाण्याने पीडित तरुणीवर पोलीस उपनिरीक्षकाचा बलात्कार