COVID-19 ; कल्याण-डोंबिवलीत १० लाखांहून अधिक नागरिकांचे सर्व्हेक्षण

ठाणे दि.११ :- कोरोना व्हायरसने देशात प्रचंड धुमाकूळ घातला आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. गेल्या दोन दिवसात रुग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. त्यातच कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आतापर्यत 50 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा :- भारतीय रेल्वेने 1 दशलक्षाहून अधिक गरजू व्यक्तींना शिजविलेले गरम अन्न मोफत पुरविले

या पार्शवभूमीवर खबरदारी म्हणून आरोग्य विभागाकडून आजपर्यंत एकूण 2 लाख 45 हजर 803 घरांना भेट देऊन 10 लाख 12 हजार 816 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंतेची बाब ठरली आहे. यावर आळा घालण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत.

हेही वाचा :- पंधरा दिवसांपासून दारू न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या !

मात्र, काही नागरिक आजही बेजबादारपणे विनाकारण किराणा दुकाने, भाजी विक्रीच्या दुकानावर सोशल ‘सोशल डिस्टंसिंग’ न ठेवताच गर्दी करत आहेत. त्यामुळे सलग 4 दिवस भाजीपाला व किरणा विक्रीवर बंदी घातली आहे. आज मोहने परिसरात एक 22 वर्षीय महिला रुग्ण आढळून आल्याने आता रुग्णांची संख्या 50 च्या घरात गेली आहे. तर यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून 11 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 37 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज आढळून आलेला हा रुग्ण मुंबईतील एका शासकीय रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.