dombivali ; पर्यायी पुलाची व्यवस्था होत नाही तो पर्यंत कोपर पूल पाडू नये
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.२४ – डोंबिवली कोपर येथील पूर्व पश्चिम जोडणारा कोपर पूल पर्यायी व्यवस्था होत नाही. तो पर्यंत पाडण्यात येऊ नये स्पोर्टिंग सिस्टीम वापरून पुलाचे दुरुस्तीचे काम करावे असा निर्णय आज मध्य रेल्वेच्या प्रबंधकाकडे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मध्य रेल्वेने आय आय टी च्या अहवालानुसार २८ ऑगस्ट पासून कोपर पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वेने कळवलं होते. मात्र हलक्या वाहनांना हा पूल वाहतुकीसाठी सुरू ठेवावा अशी पालिका व वाहतूक पोलिसांची भूमिका होती. मात्र रेल्वे प्रशासन आदमुठे पणाची भूमीकसोडण्यास तयार नव्हते.
जर कोपर पूल सर्व वाहनांसाठी बंद ठेवला असता तर ऐन गणेशोत्सवाच्या काळात डोंबिवलीत अभूतपूर्व कोंडी झाली असती व नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असता हे लक्षात घेऊन आज पर्यायी व्यवस्था होई पर्यंत पूल पाडण्यात येऊ नये असा निर्णय घेण्यात आला. यामुळे पालिका व वाहतूक विभागाने सुटकेचा श्वास सोडला आहे. डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर ब्रिज संबंधी आज मुंबई येथे डी.आर.एम. (D.R.M.) यांच्यासोबत बैठक झाली. साडे बारा मीटर लांबीचा पर्यायी पुलाचे प्रोविजन पूर्ण होत नाही तोपर्यंत सध्या सुरू असलेला पूल पाडू नये.
तात्काळ उपाययोजना करून योग्य ती सपोर्टींग सिस्टीम वापरून कोपर पुलाचे काम करावे जेणेकरून वाहतूक सुरु राहील. असे निर्देश रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री ना. पीयूषजी गोयल यांच्या समवेत चर्चा झाली असून लवकरच यासंदर्भात तोडगा काढण्यात येणार आहे . या बैठकीला रेल्वे विभागाचे प्रमुख अधिकारी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त श्री. गोविंद बोडके, वाहतूक शाखेचे प्रमुख अधिकारी व महावितरणचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.