सामाजिक संदेश देत जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा संपन्न

ठाणे दि.०८ – लोकनृत्य , समूह गीत , वक्तृत्व, नाट्य आदी स्पर्धांमधून सामाजिक संदेश देत जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थांची जिल्हा स्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा मंगळवारी एन. के.टी. सभागृहात संपन्न झाली. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या ( प्राथमिक ) वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती सुभाष पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तर बक्षीस वितरण सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दरवर्षी शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध गुणदर्शन स्पर्धा घेण्यात येतात. यंदा या स्पर्धेत सामाजिक विषयांची मांडणी करत विद्यार्थांनी स्पर्धेत रंगत आणली. या कार्यक्रमाला महिला व बाल कल्याण समिती सभापती दर्शना ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य रेखाताई कंठे, ऋता केणे, किशोर जाधव, शिक्षणाधिकारी संगीता भागवत, आदि मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा :- जिल्हा कृषी महोत्सवाचे डोंबिवलीत उद्घाटन

या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळा सहभागी होतात. केंद्र, तालुका स्तरावर विजेत्या शाळांची जिल्हा स्तरावर निवड करण्यात येते. यंदा तब्बल 350 विद्यार्थी सहभाग झाले होते. यामध्ये लोकनृत्य स्पर्धेत भिवंडी तालुक्याने प्रथम क्रमांक मिळवला तर मुरबाड, अंबरनाथ तालुक्याने अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केला . वक्तृत्व स्पर्धेच्या लहान गटात प्रथम क्रमांक उपासना किरपण, द्वितीय क्रमांक किर्ती केणे, तृतीय क्रमांक सृष्टी तरे यांनी प्राप्त केला. मोठ्या गटात प्रथम क्रमांक जागृती वेखंडे, रिद्धी हरणे, आलिशान वारसे यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला. समूहगीत स्पर्धेत लहान गटामध्ये प्रथम क्रमांक शहापूर तालुका, द्वितीय क्रमांक अंबरनाथ तृतीय क्रमांक मुरबाड तालुक्याने पटकावला. तर या स्पर्धेच्या मोठ्या गटात मुरबाड, कल्याण, शहापूर तालुक्यानी अनुक्रमे क्रमांक प्रथम, द्वितीय, तृतीय मिळवला. या स्पर्धाही घेण्यात आल्या त्यामध्ये कल्याण, शहापूर, मुरबाड तालुक्याने अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय मिळवला. या स्पर्धेमध्ये शिक्षकांसाठी नाविण्यपूर्ण शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये माधुरी वसंत सोरशे यांना प्रथम क्रमांक मिळाला. तर सुनिल पांडुरंग परटोळे, संदिप भगवान धुमाळ यांना अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email