औद्योगिक कामगारांकरता जानेवारी 2019 चा ग्राहक मूल्य निर्देशांक जारी
नवी दिल्ली, दि.०१ – जानेवारी 2019 च्या ग्राहक मूल्य निर्देशांकात 6 टक्के वाढ होऊन हा निर्देशांक 307 अंकांवर पोहोचला आहे. डिसेंबर 2018 ते जानेवारी 2019 या दरम्यान मासिक टक्केवारीच्या बदलात ही वाढ 1.99 टक्के आहे. गृहनिर्माण क्षेत्र निर्देशांकात 5.16 टक्के वाढ झाली आहे.
हेही वाचा :- श्रीपाद नाईक यांच्या हस्ते गाझियाबाद इथे राष्ट्रीय युनानी औषधी संस्थेचा पायाभरणी समारंभ संपन्न
गहू, तूर डाळ, मासे, बकऱ्याचे मांस, नारळ, भेंडी, टोमॅटो, फुले/फुलांचे हार आदी वस्तू निर्देशांकातील वाढीला जबाबदार आहेत. मात्र कांदे, वांगी, कोबी, गाजर, फ्लॉवर, मटार, बटाटे, स्वयंपाकाचा गॅस, वीज बिल यामुळे निर्देशांकात काहीशी घट झाली. जानेवारी 19 मध्ये महागाई दर 6.60 टक्के होता, तर गेल्या वर्षाच्या जानेवारी महिन्यात हा दर 5.11 टक्के होता.