लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी २ व ३ जून रोजी मतदार संघनिहाय बैठक – नाना पटोले
मुंबई दि.२६ :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने समितीची बैठक येत्या २ आणि ३ जून रोजी मुंबईत दादर येथे आयोजित करण्यात आली आहे. लोकसभा मतदारसंघ निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीला राज्यातील सर्व प्रमुख नेते व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
‘भाजप’कडून सापत्न वागणूक – खासदार गजानन किर्तीकर
धर्मांध व जातीयवादी भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हेच काँग्रेसचे लक्ष्य असून आगामी लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याचा पक्षाचा निर्धार आहे, असेही पटोले म्हणाले.
जी – २०’ गटाच्या शिष्टमंडळाकडून ‘आपदा’मित्र आणि ‘आपदासखींचे कौतुक!
या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, महाविकास आघाडी सरकार मधील काँग्रेस पक्षाचे सर्व माजी मंत्री, विधान परिषद गटनेते सतेज पाटील तसेच प्रदेश निवडणूक समन्वय समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.