ठाणे दि.११ :- केंद्र शासनाच्या अमृत-२ योजनेंतर्गत उपलब्ध झालेल्या निधीतून ठाणे शहरातील १५ तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासाठी एकूण ५३ कोटी ३६ लाख रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पालाठी २५ टक्के रक्कम टक्के केंद्र शासन, २५ टक्के राज्य शासन देणार असून उर्वरित ५० टक्के निधी महापालिकेचा आहे.
कामाचा कालावधी एक वर्षांचा असून ‘आयआयटी’ मार्फत लेखापरीक्षण करण्याचे तसेच पाण्यातील जीवसृष्टी आणि परिसरातील वनसंपदेला कोणतीही हानी पोहोचणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सुचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत.