राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, उड्डाण पुलाच्या कामातील अडथळे दूर करून प्रकल्प कालबद्धरित्या पूर्ण करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील प्रकल्पांबाबत बैठक

मुंबई दि.०९ :- राज्यात सुरू असलेल्या आणि मान्यता मिळालेल्या राष्ट्रीय महामार्ग, उड्डाण पुल, रस्ते यांच्या कामातील अडथळे दूर करून कालबद्धरित्या हे प्रकल्प पूर्ण करावेत. वन वनांच्या हद्दीतील अस्तित्वात असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती कामांसाठी वन विभागाने प्राधान्याने कार्यवाही करून ते प्रकल्प मार्गी लावावेत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

‘महारेरा’कडून ५८४ प्रकल्पांना नोटीस

राज्यातील विविध रस्ते प्रकल्प आणि नविन रस्ते प्रकल्पांबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र, पंजाबचे देशासाठी मोठे योगदान- राज्यपाल बैस पंजाब मधील युवकांची राज्यपालांशी भेट

वाढते शहरीकरण त्याचबरोबर वाढत्या पायाभूत सुविधांसाठी रस्ते, महामार्ग तसेच उड्डाणपुलांचे विविध प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू आहेत. त्याचबरोबर काही प्रस्तावित प्रकल्प जमीन संपादन तसेच वन विभागाची मान्यता यासाठी प्रलंबित आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या या प्रकल्पांना तातडीने गती देण्याची आवश्यकता आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. १५ वर्षापूर्वीची वाहने मोडीत काढण्याचे धोरण केंद्र शासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार अशी वाहने मोडीत काढावी यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात स्क्रॅपिंग युनिट सुरू करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी केले. मोठ्या आणि विकसीत जिल्ह्यांमध्ये ४ आणि लहान अविकसीत जिल्ह्यात दोन अशी किमान १५० ते २०० युनीट सुरू करण्याची सूचनाही गडकरी यांनी केली.

गोराई जेट्टी आणि समुद्र किनाराही सुशोभित होणार

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत मुंबई विभागात चार, सहा आणि आठ पदरी मार्गिकांचे ९ प्रकल्पांच्या ४३५ किमी लांबीचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. ६२१ किमी लांबीचे सहा न्यू ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे, १७८ किमी लांबीचे तळेगाव, चाकण, शिरूर, पुणे शिरूर, रावेत नाऱ्हे, हडपसर रावेत, द्वारका सर्कल ते नाशिक रोड स्टेशन अशा या ५ एलिव्हेटेड कॉरिडोअर्सचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील कळंबोली आणि अन्य सहा ठिकाणच्या जंक्शनच्या विकासकामांविषयी चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामासाठी सात किमीच्या जमीन संपादनाविषयीही चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published.