पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.२० :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात मदत आणि पुनर्वसन तसेच कृषी विभागाला हे आदेश देण्यात आले.

हेही वाचा :-  अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.