पंतप्रधानांच्या निवडक भाषणांचे संकलन असणाऱ्या सबका साथ सबका विकास या पुस्तकाचे अरुण जेटली यांच्या हस्ते प्रकाशन
नवी दिल्ली, दि.०८ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडक भाषणांचे संकलन असणाऱ्या सबका साथ सबका विकास या पुस्तकाचे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रकाशन झाले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) राज्यवर्धन राठोड उपस्थित होते. पोलीटिकल सायन्स अर्थव्यवस्था, परकीय धोरण, धोरणात्मक मुद्दे यासह इतर विषयांवर पंतप्रधानांची उत्कृष्ट पकड आहे. पंतप्रधान कोणतीही गोष्ट जलद आकलन आणि ग्रहण करतात असे सांगून त्याला विचारांच्या स्पष्टतेची जोड लाभली आहे. यामुळेच त्यांची भाषणं ओघवती असतात असे जेटली म्हणाले. पंतप्रधानांच्या भाषणाची छाप केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात राहिली आहे असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :- उपायुक्त सु रा पवार यांना अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी
विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या पंतप्रधानांच्या भाषणात सरकारच्या धोरणांचे आणि देशातल्या कानाकोपऱ्यातल्या जनतेपर्यंत पोहोचण्याची निष्ठा प्रतिबिंबित होत असल्याचे राज्यवर्धन राठोड यावेळी म्हणाले. भाषणाचे हे पाच खंड म्हणजे युवा विद्यार्थी, संशोधक, पत्रकार यासारख्या वर्गासाठी ज्ञानकोश आहे असे राठोड म्हणाले. आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या कर्तृत्वाला त्यांनी सलाम केला. या पाच खंडांच्या संपादनात कांचन गुप्ता यांनी बजावलेली भूमिका माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी ठळकपणे मांडली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने पाच खंडांचे हे पुस्तक प्रकाशित केले असून ते हिंदी आणि इंग्रजी भाषेत आहे. प्रकाशन विभागाच्या विक्री विभागात आणि नवी दिल्लीत सीजीओ कॉम्प्लेक्स, सूचना भवनाच्या पुस्तक गॅलरीत हे पुस्तक उपलब्ध आहे. भारतकोष-ई पेमेंट गेटवेवर ऑनलाईनही या पुस्तकाची खरेदी करता येईल. ॲमेझॉन आणि गुगल प्लेच्या ई बुक्सवरही हे पुस्तक उपलब्ध राहील.