मंत्रालय माउंट मनिरंग मोहिमेसाठी महिलांच्या पथकाला कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी हिरवा झेंडा दाखवला

माहिती आणि प्रसारण तसेच युवा आणि क्रीडा राज्यमंत्री( स्वतंत्र कार्यभार ) कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी आज हिमाचल प्रदेशातील माऊंट मणिरंग( ६५९३ मीटर/ २१६३१ फूट) मोहिमेसाठी महिलांच्या पथकाला हिरवा झेंडा दाखवला.

१९९३ मध्ये महिलांनी एव्हरेस्ट सर केल्याच्या रौप्यमहोत्सवा निमित्त ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. मोहिमेसाठी संपूर्ण पथक महिलांचे पाठवण्याच्या निर्णयाबद्दल भारत गिर्यारोहण संघाचे राठोड यांनी कौतुक केले. संधी दिली तर मुली उत्तमप्रकारे आव्हान पेलू शकतात आणि स्वतःचा ठसा उमटवू शकतात , असा सुंदर संदेश यातून समाजाप्रती जात असल्याचे ते म्हणाले.

आपल्याला भविष्यात काय करायचे आहे याचा निर्णय घेण्याची संधी मुलांना दिली पाहिजे , हेही यातून सूचित होत असल्याचे ते म्हणाले. जो खेळेल तो वाढेल असे पंतप्रधान नेहमी म्हणत असल्याची आठवण राठोड यांनी करून दिली. बर्फ किंवा पर्वत नसलेल्या राज्यातल्या मुलींचा समावेशही मणिरंग मोहिमेत आहे. यातून अशा प्रकारचे आव्हान स्वीकारण्याची मुलींची इच्छाशक्ती आणि निर्धार दिसून येत असल्याचे ते म्हणाले. देशात साहसी क्रीडा प्रकारांना अधिक निधी आणि प्रसिद्धीची गरज त्यांनी व्यक्त केली.

१९ सदस्यांच्या या पथकाचे नेतृत्व १९९३ च्या पथकातील सदस्य, गिर्यारोहक विमला नेगी करत आहेत. पथकात युवा गिर्यारोहकांबरोबरच १९९३ च्या पथकातील ९ जणींचा समावेश आहे. पथकामध्ये उत्तराखंड, पश्चिम बंगाल , सिक्कीम, झारखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश , हरियाणा,गुजरात, मणिपूर आणि हिमाचल प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यातील मुलींचा समावेश आहे. २४ ऑगस्ट २०१८च्या सुमाराला पथक शिखर सर करण्याचा प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे.

भारत-नेपाळ महिलांची १९९३ मधली एव्हरेस्ट मोहीम, सर्व महिला असलेली पहिलीच मोहीम होती. क्रीडा आणि युवा मंत्रालय पुरस्कृत भारतीय गिर्यारोहण संघाने ही मोहीम राबवली होती. २१ सदस्यांच्या या मोहिमेचे नेतृत्व बचेंद्री पाल यांनी केले होते. या ऐतिहासिक मोहिमेने त्या वेळी अनेक विक्रमांची नोंद केली होती. उदा. माऊंट एव्हरेस्ट सर करण्याच्या एकाच मोहिमेत सर्वाधिक (१८) सदस्यांचा समावेश , एव्हरेस्टवर चढणाऱ्या एकाच देशातील सर्वाधिक (६) महिला. पथकातील संतोष यादव एव्हरेस्ट सर करणाऱ्या जगातील पहिल्या महिला ठरल्या. तर डिकी डोल्मा एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वात तरुण महिला ठरल्या होत्या.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email