महिला बचत गटांनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांची विक्री केली जाणार

कडोंमपा घनकचरा व्यवस्थापन विभागाचा उपक्रम

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

डोंबिवली दि.१७ – कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बाजारपेठांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्यासाठी आता महिला बचत गटांनी तयार केलेल्या कापडी पिशव्या विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.‌ महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे बाजारपेठांमध्ये महिला बचत गटांना यासाठी विशेष जागा दिली जाणार आहे.

हेही वाचा :- जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत रुद्रांक्ष, अर्जुन, किरणला सुवर्णपदक

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा येथे दहा प्रभागांच्या हद्दीत फेरीवाले, भाजीपाला, फळ, मासळी बाजार भरतो या ठिकाणी या कापडी पिशव्या दुकानदार व ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सर्वाधिक वर्दळीच्या बाजारपेठा निश्चित झाल्या की हा उपक्रम सुरू केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.