इयत्ता १२ वीचा निकाल उद्या
मुंबई दि.२४ :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (गुरुवार) जाहीर करण्यात येणार आहे.
रेल्वे तिकीटांचे आरक्षण करून चढ्या दराने विक्री करण्याच्या षडयंत्राची चौकशी करा- अजित पवार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर जाहीर होणार असून https://hsc.mahresults.org.in http://hscresult.mkcl.org या संकेतस्थळावर दुपारी दोन नंतर निकाल पाहता येईल.
गुणपत्रिका ५ जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहेत. २६ मे ते ५ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे.
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात अक्षयकुमार छत्रपती शिवाजी महाराज साकारतोय
दरम्यान यंदापासून नवीन राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी राज्यातील सर्वच अकृषिक विद्यापीठांमध्ये होणार आहे. त्यामुळे बारावीनंतरचे शिक्षण आता त्या धोरणानुसारच घ्यावे लागणार आहे. त्याचीही तयारी युद्धपातळीवर सुरु झाली आहे.