रिक्षाच्या धडकेत चिमुरडा जखमी

डोंबिवली – म्हारळ गावच्या मंदिरासमोर असलेल्या प्राजक्ता कॉलनीमध्ये राहणाऱ्या आरती भादवे या आपल्या तीन वर्षांच्या मुलासह शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील ओक बाग येथे थांबल्या होत्या. इतक्यात भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने मुलगा आयुष याला जोरदार धडक दिली. या धडकेत आयुष हा जबर जखमी झाला. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात भादवे यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी फरार रिक्षाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email