मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, इच्छा असूनही इथे येता आले नाही

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.२२ :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेली दहा वर्षे शिवाजी पार्क येथे दीपोत्सव साजरा करत आहे. आम्हाला इथे यायची खूप इच्छा होती.‌ पण इच्छा असूनही इथे येता आले नाही, अशी मिश्किल टिपणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केली. ‘मनसे’तर्फे शिवाजी पार्क इथे आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित झाला त्यावेळी शिंदे बोलत होते.

हेही वाचा :- राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेचे महाराष्ट्रात सात नोव्हेंबरला आगमन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अन्य नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती. यंदाच्या वर्षी आपण सगळेच सण आणि उत्सव भव्यदिव्य स्वरूपात साजरे करण्याचे ठरविले आहे. आता आपण सगळेच मोकळा श्वास घेत आहोत याआधी आम्ही सर्व दबून होतो असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.