मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस निर्णयच घेतले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे दि.२४ – मराठा समाजासाठी आमच्या सरकारने कधीही अधांतरी निर्णय घेतलेले नाहीत, आरक्षण असो किंवा शिक्षण आणि रोजगार, आम्ही समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत, न्यायालयात देखील लढा देण्याची आमची पूर्ण तयारी आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितले. माजी आमदार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सत्कार समारोहप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. घणसोलीच्या सेक्टर ७ मधील सिम्प्लेक्स कॉमन मैदान येथे काल सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आदींची उपस्थिती होती. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नरेंद्र पाटील यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

हेही वाचा :- कॅन्सरपिडीत रुग्णांसाठी ‘रोटरॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली `केशदान करा` उपक्रम

तर मराठा समाजाच्या युवकांसाठी उचललेल्या पावलांबद्धल मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांचा ह्रदय सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, युवकांना बँकांनी कर्जे दिलीच पाहिजेत, बँकांचे काही प्रश्न असतील पण समाजाच्या युवकांसाठी शासन प्रयत्न करीत असून बँकांनी सहकार्य केलेच पाहिजे. यासाठी युवकांनी देखील बँकांवर दबाव वाढविला पाहिजे. वडाळा येथील घरांचा प्रश्न सुटला आहे असे सांगन मुख्यमंत्री म्हणाले की, सिडकोच्या घरांमध्ये देखील माथाडीना घरे राखून ठेवली आहेत. घणसोली येथील सिम्प्लेक्स वसाहतीचा क्लस्टर पद्धतीने विकास करण्याचा प्रयत्न कसा करता येईल हे पाहण्यासाठी लवकरच एक बैठकही आयोजित करण्यात येईल.

हेही वाचा :- डोंबिवली ; रेरा कायद्याचा महिला पतपेढीवर परिणाम कर्ज घेणा-याचा ओघ कमी झाला

नवी मुंबईतील विस्तारित गावठाणांचे सर्व्हेक्षण सिडकोच्या माध्यमातून करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे क्लस्टर तसेच घरांच्या विकासास गती येईल अशी माहितीही त्यांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्या मागणीचा संदर्भ देऊन दिली. माथाडीच्या संघटनेत आम्हाला राजकारण आणायचे नाही. नरेंद्र पाटील हे खूप संवेदनशील आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले. राजकारण आणि समाजकारणात शंकराप्रमाणे स्वतः विष पचवून अमृत लोकांना द्यावे लागते, मी गेली 4 वर्षे तेच करतोय मात्र समाजाप्रती असलेली माझी जबाबदारी मी पार पाडतच राहील असेही मुख्यमंत्री टाळ्यांच्या कडकडाटात म्हणाले. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, नरेंद्र पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email