छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार ध्वनिफीतीद्वारे मंत्रालयात ऐकवणार
मंत्रालयात आजपासून उपक्रमाला सुरुवात
मुंबई दि.१० :- छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, कार्य आणि विचार यांचे स्मरण मंत्रालयात दररोज करण्यात येणार आहे. आजपासून या उपक्रमास सुरुवात झाली. दररोज सकाळी १०.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सार्वजनिक उदघोषणा यंत्रणेमार्फत ऐकविण्यात येणार आहेत.
दहिसर ते मिरारोड मार्गिकेच्या कारशेडसाठीची जागा लवकरच ‘एमएमआरडीए’ च्या ताब्यात येणार
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातर्फे हा उपक्रम वर्षभर मंत्रालयात राबविण्यात येणार आहे.