छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

उरण दि.१५ – श्री क्षेत्र वढु (बु)पुणे-अहमदनगर रस्ता(कोरेगाव भीमा जवळ) ता. शिरूर जि पुणे येथे धर्मवीर शंभु छत्रपती संभाजी महाराजांचे समाधिस्थान असून हे समाधिस्थान राष्ट्रभक्ति आणि स्वधर्मनिष्ठेचे ज्वलंत प्रेरणा स्थान आहे. अवघ्या नऊ वर्षाच्या कारकिर्दि मध्ये त्रिचनापल्ली पासून ब-हाणपुर पर्यंत हिंदुत्वाची विजयी घौडडौद करून औरंगजेब सारख्या बलाढ्य आणि कपटी शत्रुला असहाय्य बनवना-या श्री शंभु छत्रपतींना विसरण्याचे महापाप राष्ट्रप्रेमी मराठी जनता कधिही करणार नाही ! त्यांनी 39 दिवसांचा यातनामय मृत्युदंड स्वीकारला परंतु हिंदु धर्माचा अभिमान सोडला नाही. त्यांच्यामुळेच हिंदुस्थानचे हिंदुत्व राहिले. या महान राष्ट्रीय योगदानाबद्दल त्यांची प्रेरणादायी स्मृती जपणे हीच खरी कृतज्ञता आहे असे मत प्रसिद्ध व्याख्याते मिलिंद एकबोटे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा :- डोंबिवली ; कोपर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने प्रवाशांचा खोळंबा

छावा प्रतिष्ठान चिरनेर-भोम-कळंबुसरे,युद्ध नौका ग्रुप, ग्रामस्थ मंडळ चिरनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि 14/5/2019 रोजी उरण तालुक्यातील श्री दत्त मंदिर, चिरनेर-कातळपाडा येथे श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती व श्री सत्यनारायणाची पूजा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.रात्री शिवसंत,प्रसिद्ध व्याख्याते मिलिंद एकबोटे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते त्या प्रसंगी ते बोलत होते. सदर कार्यक्रम प्रसंगी कुंदा ठाकुर(जि.प सदस्य),बाजीराव परदेशी(जि.प.सदस्य),विजय भोईर(जि.प.सदस्य),एकनाथ पाटिल(माउली इंटरप्राइजेस),वैजनाथ ठाकुर(माजी जिल्हा परिषद सदस्य),भास्कर मोकल(माजी सभापती पंचायत समिती उरण),सौरभ करडे(शिव चरित्रकार पुणे),राजू मुंबईकर(रायगड भूषण) आदि मान्यवर उपस्थित होते. आपल्या व्याख्यानात मिलिंद एकबोटे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा संपूर्ण जीवंत इतिहास नागरिकांसमोर उभा केला. देशासाठी, धर्मासाठी शंभु राजे यांनी आपले स्वतः चे कसे बलिदान दिले याविषयी उपस्थितांना माहिती दिली.शंभुराजांचे स्मृती निरंतर जपण्यासाठी वडु बुद्रुक येथे शंभुतीर्थ(छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक) साकारण्याचा संकल्प सुरु असल्याची माहिती एकबोटे यांनी दिली.

हेही वाचा :- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सात दिवस ‘ब्लॉक’, जाणून घ्या वेळापत्रक

शंभुतीर्थ‘ या नावाने संभाजी महाराजांचे स्मारकाचे दगडी स्वरूपातील बांधकाम पूर्ण झाले असून आता शंभुछत्रपतींच्या जीवन चरित्रावर आधारित शिल्पसृष्टिची पूर्व तयारी सुरु झाली आहे तेंव्हा नागरिकांनी, शिव भक्तांनी निस्वार्थ भावनेने राष्ट्रीय कार्य समजून या स्मारकास आर्थिक मदत करून सहाय्य करावे असे आवाहन मिलिंद एकबोटे यांनी यावेळी केले. दरवर्षी छावा प्रतिष्ठानच्या वतीने चिरनेर येथे श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते याबाबत एकबोटे यांनी छावा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे कौतुक केले. व शिवकार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सकाळी 9 वा. नम्रता पाटिल यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 10 वा. प्रीती चिर्लेकर,ताईबाई म्हात्रे यांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा, दुपारी 3 वा. पालखी मिरवणूक सोहळा-पालखी उचलन्याचा कार्यक्रम,संध्याकाळी 7 ते 8 महाप्रसाद, रात्री 8 ते 9 स्वर साधना गीतमंच कातळपाडा यांचा शिवगीतांचा कार्यक्रम,रात्री 9 वा-श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवसंत मिलिंद एकबोटे(अध्यक्ष समस्त हिंदु आघाडी)यांचे प्रभावी व्याख्यान आदि विविध उपक्रम दिवसभरात संपन्न झाले.

हेही वाचा :- तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराला डोंबिवलीतून अटक

छावा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी श्री संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तिंचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह,पुष्पहार देउन त्यांचा कार्याचा गौरव केला जातो. या वर्षी 2019 चा वृक्षलागवड व स्वच्छता क्षेत्रातील पुरस्कार सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे तर फॉन या संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र जयवंत ठाकुर यांना अनेकांचे जीवन वाचविल्या बद्दल श्री छत्रपती संभाजी महाराज सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुभाष कडु(संस्थापक अध्यक्ष छावा प्रतिष्ठान-युद्धनौका ग्रुप),उत्सव अध्यक्ष सचिन कडु(माजी सैनिक),रत्नप्रभा केणी(उत्सव अध्यक्षा),सुशील म्हात्रे(उपाध्यक्ष),सचिन केणी(खजिनदार),रमेश कडु(सहकार्याध्यक्ष),संतोष भोईर (कार्याध्यक्ष),तुषार केणी (सहकार्याध्यक्ष), महेश केणी(सहखजिनदार),धीरज केणी(सचिव),सदस्य-संकेत म्हात्रे, किरण म्हात्रे, सचिन कडु आदि छावा प्रतिष्ठान(युद्धनौका ग्रुप)चे पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email