पोलिशच्या बहाण्याने हातचलाखीने दागिने लंपास
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.२८ – भांडी दागिने पोलिश करून देण्याचा बहाणा करत घरात घुसून हातचलाखीने महिलेचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
डोंबिवली पूर्वेकडील गोपाळ नगर गल्ली दत्त कृपा सोसायटी मध्ये राहणारे धवल वाटवे यांची आई घरात एकटी असल्याची संधी साधत दोन अज्ञात इसम त्यांच्या घरी आले. भांडे दागिने पोलिश करून देतो असा बहाना देत त्यांच्या आईला बोलण्यात गुंतवले आईने त्याला तांब्याची कळशी दिली असता या भामट्याने पावडरने घासून ती चमकवून दिली त्यानंतर त्याने तुमच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीच्य सोन्याच्या पाटल्या पोलिश करून देतो असे सांगितले या आमिषाला बळी पडत वाटवे यांच्या आईने त्याला दागिने देबून केले याच दरम्यान त्याने हात चलाखीने पोलिश ला दिलेले दागिने लंपास करत तेथुण काढता पाय घेतला. दागिने चोरून नेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी दोन अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.