जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यात बदल
मुंबई दि.१४ :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल केले असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्याला मान्यता दिली आहे.
हेही वाचा :- डोंबिवलीत मंगळसूत्र चोराला चोप
हे बदल खालीलप्रमाणे आहेत.
जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते श्री.जयंत पाटील यांना देण्यात आले असून अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण हे खाते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आले आहे.