लोकपाल अध्यक्षांनी लोकपाल सदस्यांना दिली शपथ
लोकपाल अध्यक्ष न्यायमूर्ती पी.सी.घोष यांनी आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात लोकपाल सदस्यांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती दिलीप बाबासाहेब भोसले, न्यायमूर्ती प्रदीप कुमार मोहंती, न्यायमूर्ती अभिलाषा कुमारी, न्यायमूर्ती अजय कुमार त्रिपाठी, दिनेश कुमार जैन, अर्चना राम सुंदरम्, महेंद्र सिंह, डॉ. इंद्रजित प्रसाद गौतम या सदस्यांनी शपथ घेतली. केंद्रीय दक्षता आयुक्त के.व्ही.चौधरी, गुप्तचर विभागाचे संचालक राजीव जैन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.