अभाविप कल्याण शाखा तर्फे विजयोउत्सव साजरा!
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कल्याण शाखेच्या वतीने पुलवामातील शहीद झालेल्या जवानांचा वायुसेनेच्या वतीने बदला घेण्यात आला रात्री ३.३० मिनिटानी मिराज २००० या लढाऊ विमानानी पाकिस्तानात घुसून हल्ला करून त्यांचे ३००+ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला याचाच विजयोउत्सव अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कल्याण शाखे कडून कल्याणच्या खडकपाडा सर्कल येथे फटाके फोडून आणि मिठाई वाटून घोषणांच्या गजरात आनंद साजरा करण्यात आला
या वेळेस कल्याण जिल्हा संयोजक अमोल सोळंके, जिल्हा संघटन मंत्री ज्ञानेश्वर पवार, शहर महाविद्यालय प्रमुख चंदन वझे, शहर विद्यार्थीनी प्रमुख मानसी जाधव,महाविद्यालय सहप्रमुख तेजड कोंडार,रवी शर्मा, प्रणव गायकवाड, हर्षदा क्षीरसागर,आदित्य खैरे श्रीकृष्ण खैरनार, यश जाधव, मयूर आहेर, आनंद बेंडकोली अ.भा.वि.प कल्याणचे कार्यकर्ते उपस्थित होते.