सारडे गावात शिवजयंती साजरी.

उरण दि.२६ – उरण तालुक्यातील सारडे गावात शिवसेना ,युवासेना ग्रामस्थ सारडे आणि शिवछत्रपती ब्रास बँड गोवठणे संयुक्त विद्यमानाने पवित्र असा शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला ह्या प्रसंगी वैभव पाटील, अजय पाटील,अमोल पाटील,प्रसाद म्हात्रे,भुषन पाटील, काणिफनाथ पाटील, गुलशन, प्रशांत भगत, म.ण म्हात्रे,शाखाप्रमुख दिलीप पाटील,उपशाखाप्रमुख अशोक पाटील, युवासेना अध्यक्ष प्रेमनाथ भोईर. युवासेना उपाध्यक्ष हरिश्चंद्र जोशी,एस के म्हात्रे, मधुसुदन पाटील,हेमंत पाटील. सुलक्षणा पाटील,विकास पाटील, सै.भगवती-ग्रामपंचायत सदस्य सारडे,भाणुदास पाटील,माजी सरपंच सदिंप पाटील, विश्वनाथ म्हात्रे, विश्वनाथ माळी, नितीन म्हात्रे,अविनाश पाटील, मिलन पाटील आदि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सारडे गावातील अत्यंत पवित्र मानले जाणारे स्थान म्हणजेच घोल, ह्याच ठिकाणी बायांचे(देवतेचे) वास्तव्य आहे असे मानले जाते तसेच येथें छत्रपति शिवाजी महाराजांना अभिषेक घालून शिवसेना शाखा सारडे तर्फे येथे महाआरती करण्यांत आली आणि सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला ह्या पवित्र शिवजयंती उत्सवात गोवठणे शिव छत्रपति ब्रास बँड यांच्या सहकार्यांने सुमधुर संगित व वादनाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला. ह्या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे आई तुझे देऊळ हे भक्तीगीत तसेंच भावगीतांबरोबर जय जय महाराष्ट्र माझा हे देश भक्तीगीत सुद्धा वादन करण्यात आले हा कार्यक्रम सर्वांना आवडला .हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email