कॅन्सरपिडीत रुग्णांसाठी ‘रोटरॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली `केशदान करा` उपक्रम

डोंबिवली :- दि. २४ ( प्रतिनिधी ) कॅन्सरपिडीत रुग्णांसाठी ‘रोटरॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली सनसिटी’च्या सदस्यांनी मिळून `केशदान करा`उपक्रम राबविला आहे.या उपक्रमात रोटरॅक्टर्स तसेच भारताबाहेरील नॉन-रोटरॅक्टर देखील सहभागी झाले.या उपक्रमानुसार कॅन्सरग्रस्त लोकांसाठी आपल्या केसांना दान करून त्याचे गंगावण (विग) बनवले जातील.या उपक्रमाला आतापर्यंत ४८ डोनर्सची साथ लाभली आहे. या उपक्रमासाठी मुंबई, पुण्याकडून चांगला प्रतिसाद मिळाल ‘रोटरॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली सनसिटी’च्या सदस्या अमरी नेवे यांनी ही केस दान करून प्रकल्पाच्या दिशेने योगदान दिले. ‘कोप विथ कॅन्सर’ या एका एनजीओच्या सहकाऱ्याने सदर उपक्रम अंमलात आणला गेला.

हेही वाचा :- डोंबिवली ; रेरा कायद्याचा महिला पतपेढीवर परिणाम कर्ज घेणा-याचा ओघ कमी झाला

ज्याद्वारे कर्करोगाच्या रूग्णांसाठी कस्टमाइज्ड विग तयार होतात. या प्रकल्पाचे मुख्य उद्दीष्ट होते की, ‘कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आणणे. त्यासाठी आम्ही आमच्या दात्यांकडून केस गोळा केले आणि वरील एनजीओच्या पूजा गुप्ता यांच्याकडे सुपूर्द केले. ‘यू रॉक सलून’ आणि ‘ऋतुजा ब्युटी पार्लर’ आणि ‘आरती सलून’, ‘शिवस सलून’, ‘विब्स‘, ‘निता पार्लर’, ‘उमाश्री पार्लर’ यांनी या प्रकल्पाची प्रशंसा केली.”रोटरॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली सनसिटीद्वारे चालू असलेल्या या उपक्रमाला आतापर्यंत ४८ डोनर्सची साथ लाभली आहे. ही साथ अशीच वाढत जायला हवी. प्रत्येक डोनरला सनसिटी क्लब आणि एनजीओ तर्फे प्रशंसा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे,” असे ही या प्रकल्पाच्या अध्यक्षांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.