एटीएममधील रोख रक्कम उपलब्ध
नवी दिल्ली, दि.२४ – देशातील काही एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध नसल्याचे अहवाल वर्तमानपत्रांमध्ये प्रसारित झाले होते. केंद्र सरकारला त्याची कल्पना आहे. काही हंगामी कारणांमुळे देशात रोख रक्कमेची मागणी वाढल्यामुळे एटीएममधून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आहरित करण्यात आली. परिणामी, काही काळ अशा एटीएममध्ये रोख रक्कम नसल्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र एटीएममध्ये पुरेशी रक्कम जमा करण्यासाठी चलन उपलब्ध असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. देशात आजघडीला १८ जुलै २०१८ रोजी प्राप्त माहितीनुसार २.९३ लाख कोटी रुपयांचे चलन उपलब्ध आहे अशी माहिती वित्त राज्यमंत्री प्रताप शुक्ला यांनी आज राज्यसभेत दिली.
Please follow and like us: