उपग्रह आणि प्रक्षेपण यानासाठी टेलिमेट्री ट्रॅकिंग आणि टेलीकमांड स्थानकाचे परिचालन आणि अंतराळ संशोधन, विज्ञान आणि वापर क्षेत्रात सहकार्याबाबत भारत आणि ब्रुनेई दारुसलाम यांच्यातील सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने उपग्रह आणि प्रक्षेपण यानासाठी टेलिमेट्री ट्रेकिंग आणि टेलीकमांड स्थानकाचे परिचालन आणि अंतराळ संशोधन, विज्ञान आणि वापर क्षेत्रात सहकार्याबाबत भारत आणि ब्रुनेई दारुसलाम यांच्यातील सामंजस्य कराराला मंजुरी दिली. या करारावर १९ जुलै २०१८ रोजी नवी दिल्लीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
लाभ:
या करारामुळे भारताला आपली अंतराळ मोहीम तसेच प्रक्षेपण यानासाठी तळ स्थानकाचे परिचालन सुरु ठेवणे, देखभाल आणि त्यात सुधारणा करण्याचे काम सुरु ठेवण्यात मदत मिळेल. तसेच भारताला अंतराळ तंत्रज्ञानाच्या वापराबाबत ब्रुनेई दारुसलामच्या अधिकारी आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून अंतराळ संबंधी घडामोडीत आपले कौशल्य आणि अनुभव यांचे आदान प्रदान करण्यात मदत मिळेल.
या करारांतर्गत ब्रुनेई दारुसलामबरोबर सहकार्यातून भारताच्या अंतराळ मोहीम आणि प्रक्षेपण यानाच्या मदतीसाठी भारतीय तळ स्थानकाच्या परिचालन, देखभाल आणि सुधारणा यात मदत मिळेल. देशातील सर्व क्षेत्र आणि घटकांना याचा लाभ होईल.
या करारामुळे अंतराळ तंत्रज्ञान वापर क्षेत्रात प्रशिक्षण आणि तळ स्थानकाच्या परिचालनात नवीन संशोधन कार्याला प्रोत्साहन मिळेल.