विमा नियामक क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यातील सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, दि.२९ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण आणि अमेरिकेचे संघीय विमा कार्यालय यांच्यातील सामंजस्य कराराला मंजुरी दिली.

हा करार प्रत्येक प्राधिकरणाच्या संक्षिप्त विवरण आणि अन्य कायदेविषयक जबाबदाऱ्यांसंदर्भात माहिती आणि संशोधन सहकार्याचे आदान-प्रदान करण्याबरोबरच सहकार्य आणि समन्वयासाठी एक आराखडा प्रदान करेल. या कराराअंतर्गत, दोन्ही देश विविध नियामक कार्याबाबत आपले अनुभव सांगतील आणि प्रशिक्षण उपक्रमांसह परस्पर सहकार्य पुरवतील. आंतरराष्ट्रीय मानक स्थापन करण्यासंबंधी योजनांवर सहकार्य वाढवणे सुरु ठेवण्याबरोबरच आर्थिक स्थैर्य आणि विमा क्षेत्राच्या मजबूत मितव्ययी नियमकाच्या माध्यमातून ग्राहक संरक्षणाच्या विकास आणि अंमलबजावणीबाबतही उभय देशांमध्ये सहमती झाली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email