भारत आणि रोमानिया यांच्यात पर्यटन क्षेत्रातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, दि.१० – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने क्षेत्रामध्ये भारत आणि रोमानिया सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने कार्योत्तर मंजुरी दिली आहे. सप्टेंबर 2018 मध्ये देशाच्या उपराष्ट्रपतींच्या रोमानिया भेटी दरम्यान या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती.

या कराराचे मुख्य उद्दीष्ट पुढीलप्रमाणे आहेत:

पर्यटन क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढविणे
पर्यटन संबंधित माहितीची देवाणघेवाण करणे. हॉटेल्स आणि टूर ऑपरेटरसह पर्यटन क्षेत्रातील भागीदारांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देणे.
पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रात गुंतवणूक
दोन्ही मार्गावरील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी टूर ऑपरेटर/प्रसारमाध्यम/ जनमत बनवणाऱ्यांच्या भेटीची देवाणघेवाण करणे
प्रोत्साहन, विपणन, गंतव्य विकास आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील अनुभवांची देवाण-घेवाण करणे.
दोनही देशांना आकर्षक पर्यटन स्थळे म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी चित्रपट पर्यटन माध्यमातून द्विपक्षीय सहकार्याला चालना देणे
सुरक्षित, सन्माननीय आणिशाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देणे.
दोन्ही देशांतील पर्यटन सुलभ करणे.
भारतासाठी रोमानिया हे एक क्षमतापूर्ण पर्यटन क्षेत्र आहे (2017 मध्ये भारताने रोमानियामधील अंदाजे 11844 पर्यटकांची नोंद केली). रोमानियातून पर्यटकांचे आगमन वाढविण्यात हा करार महत्त्वपूर्ण असेल.

पार्श्वभूमी :

भारत आणि रोमानिया यांच्यात मजबूत राजनैतिक आणि दीर्घ आर्थिक संबंध आहेत. आता स्थापलेल्या नातेसंबंधाला बळकट आणि आणखी विकसित करण्यास दोन्ही देश इच्छुक असून भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालय आणि रोमानिया सरकारच्या पर्यटन मंत्रालयामध्ये या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email