दिल्ली मेट्रो मार्गाच्या दिलशाद गार्डन ते न्यू बस अड्डा गाझियाबाद विस्तारीकरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, दि.२३ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रो मार्गाच्या दिलशाद गार्डन ते न्यू बस अड्डा गाझियाबाद विस्तारीकरणाला मंजुरी दिली आहे. या विस्तारित मार्गाचे एकूण अंतर 9.41 किमी असेल. विस्तारीकरणाचा एकूण खर्च 1,781.21 कोटी रुपये असून यासाठी 324.87 कोटी रुपये केंद्रीय अर्थसहाय्य द्यायला देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

हेही वाचा :- वस्तू आणि सेवा कर अपिलीय न्यायाधिकरणाच्या राष्ट्रीय पीठ निर्मितीसाठी मंत्रिमंडळाची मंजुरी

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे NCRला आवश्यक अतिरिक्त सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होतील. दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळ लिमिटेडनेही केंद्र सरकार आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकारची विशेष उद्देशासाठी स्थापन कंपनी (SPV) या प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.