बीएलएल कंपनी बंद करायला मंत्रिमंडळाची मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक केंद्रीय समितीने बायको लॉरी लि. (बीएलएल) कंपनी बंद करण्याच्या तसेच कंपनीच्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती योजना (व्हीआरएस)/स्वेच्छा विलग योजना (व्हीएसएस) देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व देणी पूर्ण केल्यानंतर बीएलएलची मालमत्ता विधायक कामासाठी वापरली जाईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू कंपनीने या कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी वेळोवेळी पावले उचलली. मात्र, कंपनीचे पुनरुज्जीवन होऊ शकले नाही आणि स्पर्धात्मक उद्योग, वातावरण तसेच मोठ्या भांडवलाची आवश्यकता याचा विचार करून पुनरुज्जीवन शक्य नसल्याचे आढळून आले. सातत्याने होत असलेल्या तोट्यामुळे अनिश्चित भवितव्याच्या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्येचे भावना निर्माण झाली आहे.