भारत आणि इंडोनेशिया यांच्यात रेल्वे क्षेत्रातल्या तंत्र सहाय्यविषयक सामंजस्य कराराबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाला माहिती
नवी दिल्ली, दि.27 – भारत आणि इंडोनेशिया यांच्यात रेल्वे क्षेत्रातल्या तंत्र सहाय्यविषयक झालेल्या सामंजस्य कराराबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाला आज माहिती देण्यात आली. 29 मे 2018 रोजी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
खालील प्रमुख क्षेत्रात सहकार्यासाठी हा सामंजस्य कराराचा ढाचा पुरवणार आहे-
क्षमता वृद्धीसह ज्ञान, तंत्रज्ञान, संस्थागत सहकार्य यांचे आदान प्रदान
रेल्वे क्षेत्रात सिग्नल आणि संपर्क यंत्रणेचे आधुनिकीकरण
रेल्वे कार्यान्वयन, व्यवस्थापन आणि नियमनाचे आधुनिकीकरण
लॉजिस्टिक पार्क आणि मालासाठी टर्मिनल विकसित करणे
बोगदे,पूल,ओव्हरहेड विदुयुतीकरण आणि वीज पुरवठा यंत्रणा यासाठी बांधकाम आणि देखभाल तंत्रज्ञानाचे आदान प्रदान
दोन्ही बाजुंनी संमत केलेली सहकार्याची इतर क्षेत्रे
पूर्व पिठीका
रेल्वे क्षेत्रातल्या तंत्र सहकार्यासाठी रेल्वे मंत्रालयाने विविध विदेशी सरकारांसमवेत सामंजस्य करार केले आहेत.हाय स्पीड कॉरिडॉर, सध्याच्या मार्गांची गती वाढवणे,जागतिक दर्जाच्या तोडीची स्थानके विकसित करणे,रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण यासह इतर क्षेत्रासाठी हे सहकार्य करार केले जात आहेत. रेल्वे तंत्रज्ञान आणि कार्यान्वयन क्षेत्रातल्या घडामोडीबाबत माहितीचे आदान प्रदान,तंत्र विषयक भेटी,प्रशिक्षण आणि चर्चासत्रे या द्वारे हे सहकार्य केले जाते.