पशुपालन आणि दुग्ध विकास क्षेत्रात भारत आणि डेन्मार्क यांच्यातल्या सामंजस्य कराराबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाला देण्यात आली माहिती

नवी दिल्ली, दि.२७ – भारत आणि डेन्मार्क यांच्यात पशुपालन आणि दुग्ध विकास क्षेत्रात झालेल्या सामंजस्य कराराबाबत केंद्रीय मंत्री मंडळाला आज माहिती देण्यात आली. १६ एप्रिल २०१८ रोजी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.

दुग्ध विकासाबाबत ज्ञान विकसित करण्यासाठी आणि संस्थात्मक बळकटीसाठी, द्विपक्षीय सहकार्य विकसित करण्याचा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.

सहकार्य,सल्लामसलत आणि संयुक्त कार्यक्रम आखण्यासाठी प्रत्येक बाजूच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला एक संयुक्त कृती गट स्थापन करण्यात येणार आहे.

पशु प्रजनन, पशु आरोग्य आणि दुग्ध विकास त्याचबरोबर पशु खाद्य व्यवस्थापन या क्षेत्रात डेन्मार्क कडून माहिती आणि तज्ञ सल्ल्याची अपेक्षा आहे ज्यायोगे परस्पर हिताच्या पशुव्यापाराबरोबरच भारतीय पशुसंपत्तीत वृद्धी आणि त्याची उत्पादकता वाढण्यासाठी मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.