सि.एच.ए. बांधवानी जमविला सि. एच.ए. बंधूसाठी दोन लाखांचा मदत निधी.

(विठ्ठल ममताबादे)

उरण दि.१० – न्हावा शेवा C.H.A. संघटनेचे सभासद ..स्व.अमर मारुती पाटील .. यांचा कामावरून घरी परतत असताना चिरनेर गावाजवळ दुर्दैवी मृत्यू झाला . स्व.अमर  हा कुटुंबात कमाविणारा कुटुंब प्रमुख होता त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात आई- बाबा , पत्नी , आणि ३ (तीन ) महिन्याचा चिमुकला मुलगा तर ७ ( सात ) वर्षाची कन्या असा परिवार आहे. स्व.अमर पाटील हा न्हावा शेवा C.H.A. संघटनेचा सभासद असल्यामुळे संघटनेच्या माध्यमातून ५०००० (पन्नास हजार ₹ ) एवढी मदत स्व.अमर यांच्या कुटुंबियांना देण्यात आली . परंतु ही दुःखद बातमी सर्वत्र पसरताच न्हावा शेवा पोर्ट मध्ये जे C.H.A. बांधव काम करत आहेत त्या सर्व C.H.A. बांधवानी सामाजिक बांधिलकी जपत स्व.अमर च्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे करत  एक हात मदतीचा सि. एच.ए.च्या भविष्याचा  हा नारा देत जवळ -पास 222000 (दोन लाख बाव्विस हजार ) रुपयांचा मदत निधी जमा केला गेला.

हेही वाचा :- उरणकरांवर जल संकट पाणी जपून वापरण्याचे आवाहन.

हा निधी स्व.अमर च्या चिमुकल्यांच्या भविष्यासाठी उपयोगी पडेल या उद्देशानं ती रक्कम स्व.अमर यांच्या पत्नीच्या नावाने दोन लाखाचा फिक्स डिपॉझिट ( F.D.) करून दिला गेला. उर्वरित रक्कम कॅश स्वरुपात देण्यात आली. एकंदर सर्व रक्कम पहता 272000 निधी स्व अमर च्या कुटुंबाला देण्यात आला. ह्या प्रामाणिक आणि नेक कार्यात सहभागी झालेल्या सर्व C.H.A. बांधवांचे, न्हावा शेवा C.H.A संघटनेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.या मदतीत JWR च्या हेमलता विश्वनाथन मॅडम यांच्या कडून दहा हजार तर सामाजिक कार्यकर्ते राजु मुंबईकर यांच्या तर्फे दहा हजार, पलक लॉजिस्टिक कडून पाच हजार रु तर विलास गावंड याज कडून एक हजार असा निधी CHA संघटनेत जमा केला गेला.  ह्या मदत रुपी सहकार्या बद्दल स्व.अमर यांचे वडील  मारुती पाटील यांच्या पाणावलेळ्या  डोळ्यांतून सर्व  C.H.A. बांधवांबद्दलची कृतज्ञता व्यक्त होताना दिसून आली .मारुती पाटिल यांनी सर्व C.H.A. बांधवांचे, न्हावा शेवा C. H.A. संघटनेचे,इतर व्यक्तिंचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.