पश्चिम युरोपमधील खरेदीदार भारतातून अन्न आणि पेय मागवणार

नवी दिल्ली, दि.०८ – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागासह भारतीय व्यापार प्रोत्साहन परिषदेने आयोजित केलेल्या इंडस् फूड-2 या वार्षिक एफ ॲण्ड बी व्यापार मेळाव्यात युरोपियन सुपर मार्केट साखळी आणि प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांचे अव्वल उत्पादक भारतातून त्यांना लागणारे अन्न आणि पेय मागवणार आहेत.

या द्वीपक्षीय सहकार्यासाठी भारतीय व्यापार प्रोत्साहन परिषद आणि एफआयएबी या स्पॅनिश महासंघाचे आंतरराष्ट्रीय संचालक मारिया कारिलो यांनी चर्चा केली. इंडस् फूड-2 दरम्यान भारतात प्रतिनिधी मंडळ पाठवण्याची इच्छा कारिलो यांनी व्यक्त केली.

नवी दिल्लीत 14-15 जानेवारी 2019 रोजी इंडस् फूड-2 चे आयोजन करण्यात आले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email