मुंबई पुणे मार्गावर बस दरीत कोसळली,बारा प्रवासी जखमी.

लोणावळा – जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळ गुरूवारी रात्री उशिरा एक खासगी बस ३० ते ४० फुट दरीत कोसळली. या बसमध्ये ४० हून अधिक प्रवासी होते. सुदैवाने बस दरीत एका झाडात अडकल्याने मोठा अपघात झाला नाही. १२  प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. परंतु, बस झाडात अडकल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.