कल्याणात घरफोडी
कल्याण दि.२४ – कल्याण पूर्व मलंग रोड आडीवली येथील गायत्री विद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या तुळशी पार्क मध्ये संजय भारंबे राहतात. बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले.
हेही वाचा :- कल्याण ; घरासमोर घाण पाणी टाकल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेस लाकडी दांडक्याने मारहाण
हि संधी साधता अज्ञात चोरट्याने त्याच्या घरचे कुलूप तोडून घरातील रोकड ,टीव्ही व सोन्यचे दागिने असा मिळून एकूण ७५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सायंकाळी घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: