कल्याण डोंबिवली परिसरात घरफोडी
डोंबिवली दि.०४ – डोंबिवलीतील क्रांतीनगर परिसरात राहणारे दादासाहेब गायकवाड यांच्या घराच्या मागील दरवाजाची कडी उखडून घरात प्रवेश करत तांब्या पितळेची भांडी आणि टीव्ही असा १५ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर कल्याण पूर्वेकडे विजयनगर परिसरातील कुंडलिक दर्शन इमारतींमध्ये राहणाऱ्या श्रीकृष्ण जाधव यांच्या घरी चोरी झाली. ते गावी गेले असल्याने चोरट्याने त्यांच्या घराचे कोयं डा तोडून दागिने रोख रक्कम आणि मोबाईल असा २४ हजारांचा मुद्देमाल चोरला ही घटना सोमवारी रात्री घडली.
हेही वाचा :-
Please follow and like us: