कल्याणात घरफोडी
डोंबिवली दि.१३ – कल्याण पश्चिम भोईर वाडी चिंतामण अपार्टमेंट येथे राहणारे अनिल गौड आपल्या पत्नीसह सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लाऊन बाहेर गेले. हि संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्याच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्या चांदीचे दागिने रोकड असा मिळून एकूण १ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.
हेही वाचा :- डोंबिवली ; कंपनीत चोरी करण्याच्या तयारीत असणारे सहा जन गजाआड मानपाडा पोलिसाची कारवाई
सायंकाळी घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
Please follow and like us: