कोळेगाव येथे घरफोडी
डोंबिवली दि.१८ – डोंबिवली पूर्व कोळेगाव येथे राहणारे सुजित म्हात्रे काल सायंकाळी राहत्या घराला कुलूप लावून बाहेर गेले होते .हि संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मागील बाजूस आलेल्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करत घरातील ७१ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले .या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलीसानी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
Please follow and like us: