उरणमधील बिल्डरांचे धाबे दणानले बिल्डरांच्या अरेरावीला बसणार चाप.
(विठ्ठल ममताबादे)
उरण दि.०६ – तक्रारदार राज सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. श्रीराजनगर,कामठा रोड उरण यांनी बिल्डर सुनील नारायण(नाना)पाटिल व सागर प्रमोद(काका)पाटिल यांच्या विरुद्ध जमीन सोसायटीच्या नावे हस्तांतरित करणे व तसेच पार्किंग मधील सामायिक जागेतील अनधिकृत बांधकाम तोडने यास्तव आपली तक्रार ग्राहक मंच रायगड यांच्याकडे नोंदविली असता ग्राहक मंचाने याबाबत मे. पाटिल असोसिएट्स नागाव उरण व त्यांचे पार्टनर सुनील नारायण(नाना) पाटिल व सागर प्रमोद(काका)पाटिल यांना दोषी ठरवून अडीच लाख रुपये नुकसान भरपाई 30 दिवसाच्या आत देण्यात यावी, पार्किंग मधील(बेसमेंट) तसेच टेरेस वरिल व सोसायटीच्या सामायिक जागेवरील इतर अनधिकृत बांधकाम 30 दिवसाच्या आत स्वखर्चाने तोडणे,90 दिवसात जमीनीचे हस्तांतरण सोसायटीकडे करणे, अतिरिक्त FSI/TDR चे फायदे स्वतः न घेता सोसायटीला द्यावा. सर्व प्रकारचे कर बिल्डरनेच भरावेत, त्रयस्थ व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे अधिकार देउ नये.श्रीराजनगर प्रोजेक्टसाठी सभासदाकडून घेतलेल्या पैशांचा संपूर्ण जमाखर्च देण्यात यावा. असे आदेश मे. पाटिल असोसिएट्स नागाव उरण व त्यांचे पार्टनर यांना ग्राहक मंच रायगड ने दिले होते या आदेशा विरुद्ध बिल्डरने राज्य ग्राहक आयोग मुंबई यांच्याकडे अपील केले होते त्यावर आदेश देताना राज्य आयोगाने बिल्डरचे अपील फेटाळून लावताना बिल्डर आपल्या कर्तव्यापासून पळून जाऊ शकत नाही. असे म्हणटले होते. त्या विरुद्ध ही बिल्डरने राष्ट्रीय ग्राहक आयोग नवी दिल्ली येथे अपील दाखल केले होते. सदर अपीलावर आदेश देताना बिल्डरने जिल्हा ग्राहक मंचच्या आदेशाची पुर्तता 6 आठवडयात करावे असे दि 20/8/2018 रोजी आदेश जारी केले. परंतु त्याही आदेशाची पूर्तता बिल्डरने केले नसल्याने राष्ट्रीय ग्राहक आयोग दिल्ली यांनी दि 12/3/2019 रोजी त्यांचे अपील पूर्णपणे फेटाळून लावले.
दि 18/3/2019 रोजी रायगड जिल्हा ग्राहक मंच यांनी बिल्डरने मोफा( MOFA)कायद्याचे कलम(4)चार प्रमाणे व राष्ट्रीय आयोगाच्या आदेशाची पूर्तता करावी अन्यथा ग्राहक संरक्षण कायदा कलम 27 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी ताकीद दिली. सदर आदेशाची पूर्तता दि 20/4/2019 पर्यंत करावी तसे न केल्यास दहा हजार रुपये दंड व 3 महीने तुरुंगवास असे आदेश दिले आहेत.
सदर न्याय मिळण्यासाठी सोसायटीच्या वतीने सचिव महेंद्र माळी, अध्यक्ष नारायण तांडेल, खजिनदार प्रदिप गावंड,संचालक महेश गावडे यांनी सोसायटीच्या सर्व सदस्यांच्या पाठिंब्यांने जिकरीचे प्रयत्न केले. न्यायालयीन कामकाजासाठी मुंबई मधील सुप्रसिद्ध विधीतज्ञ ऍड. विनोद संपत मुंबई यांनी कामकाज पाहिले. या कामात त्यांना अलीबाग येथील वकील ऍड विनोद माळी यांनी सहाय्य केले. सदर न्यायालयीन प्रक्रिया 2013 पासून सुरु आहे. सदर बिल्डर विरोधात सोसायटीच्या वतीने सचिव महेंद्र माळी यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे MOFA व MRTP कायद्यांतर्गत खटला दाखल केला आहे. तसेच उरण येथील न्यायालयात सोसायटीच्या वतीने सचिव महेंद्र माळी,अध्यक्ष नारायण तांडेल व खजिनदार प्रदिप गावंड यांनी फौजदारी खटला दाखल केला आहे. सदर दोन्ही प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत.सदर दोन्ही खटल्यात सोसायटीच्या वतीने ऍड. विनोद संपत मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड.नचिकेत कुलकर्णी मुंबई हे काम पाहत आहेत. सदर निकालामुळे बिल्डर लॉबीचे धाबे दणानले असून सर्वसामान्य जनतेत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.आता उरण मधील बिल्डरच्या अरेरावीला खूप मोठ्या प्रमाणात चाप बसणार असल्याची भावना जनते मधून व्यक्त करण्यात येत आहे.सोसायटीचे पदाधिकारी तसेच ऍड. विनोद संपत व ऍड. विनोद माळी यांच्यावर मुंबई, नवी मुंबई, पनवेल अलीबाग उरण येथून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.