बृहन्मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीवरील मल्लखांबाचे प्रशिक्षण धारावीतील दोन शाळांमध्ये पथदर्शी प्रकल्पास सुरुवात
विद्यार्थ्यांना वर्षभर निशुल्क प्रशिक्षण मिळणार
मुंबई दि.२० – विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा आणि मल्लखांब खेळाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दोरीवरील मल्लखांबाचे (रोप मल्लखांब) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महापालिका ‘जी उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षण अधिकारी राजू तडवी यांच्या नेतृत्वात हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यानंतरच्या दुर्दैवी घटनेची वस्तुस्थिती तपासण्यासाठी एक सदस्यीय समिती
धारावी भागातील बृहन्मुंबई महापालिकेच्या दोन शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर याची सुरुवात झाली असून येत्या ३० एप्रिलपर्यंत दोरीवरील मल्लखांब शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या वतीने श्रीशिवछत्रपती पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार तसेच जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ क्रीडापटू आणि प्रशिक्षक उदय देशपांडे यांच्या हस्ते झाले.
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहर विकासावर आपल्या कारकीर्दीची छाप सोडावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
त्या शिबीरानंतर दर आठवड्यात सोमवार ते गुरुवारी सकाळी १० ते ११.३० वाजेदरम्यान वर्षभराच्या कालावधीसाठी समर्थ व्यायाम मंदिराचे प्रशिक्षक या विद्यार्थ्यांना दोरीवरील मल्लखांबाचे मोफत प्रशिक्षण देणार आहेत.